You are currently viewing सिंधुदुर्गात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा; २८ जानेवारीला कणकवलीत आयोजन
Oplus_16908288

सिंधुदुर्गात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा; २८ जानेवारीला कणकवलीत आयोजन

जि. प.– पं. स. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे शक्तिप्रदर्शन; भाजपकडून जोरदार तयारी

सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा बुधवारी, २८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली आहे.

ही जाहीर सभा कणकवली येथे दुपारी ३.३० वाजता उपजिल्हा रुग्णालय समोरील पटांगणावर होणार असून, सभेच्या यशस्वी आयोजनासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे.

या जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नागरिकांशी थेट संवाद साधणार असून, राज्य सरकारच्या कामकाजाचा आढावा घेत आगामी योजना व विकासात्मक मुद्द्यांवर मार्गदर्शन करणार आहेत.

या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार नारायण राणे, मंत्री उदय सामंत, मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे तसेच आमदार दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा