जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांचा विश्वास ; बांद्यात महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ
बांदा :
बांदा पंचायत समितीतील भारतीय जनता पार्टी – शिवसेना महायुतीच्या उमेदवार सौ. रुपाली शिरसाट यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्री देव बांदेश्वर व श्री देवी भूमिका मंदिरात श्रीफळ ठेवून करण्यात आला. यावेळी महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येऊन जिल्हा परिषद तसेच आठही पंचायत समित्यांवर भाजप–शिवसेना महायुतीची सत्ता स्थापन होवो, अशी प्रार्थना करण्यात आली.
या प्रसंगी भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा परिषद बिनविरोध सदस्य व माजी सभापती प्रमोद कामत, पंचायत समिती उमेदवार रुपाली शिरसाट, माजी सभापती शितल राऊळ, शामकांत काणेकर, उपसरपंच आबा धारगळकर, माजी उपसरपंच जावेद खतिब, तोरसे माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ, शिवसेना विभागप्रमुख भैय्या गोवेकर, बांदा माजी सरपंच अशोक सावंत, दीपक सावंत, डिंगणे सरपंच संजय डिंगणेकर, माजी सरपंच जयेश सावंत, देवस्थान समिती अध्यक्ष बाळू सावंत, बांदा शहराध्यक्ष बाबा काणेकर, माजी सदस्य हुसेन मकानदार, दादू कविटकर, सिद्धेश पावसकर, रत्नाकर आगलावे, शैलेश केसरकर, निलेश देसाई, सिद्धेश महाजन, अक्षय मयेकर, साई सावंत, सुनिल धामापुरकर, सुधीर शिरसाट, प्रवीण नाटेकर, संदीप बांदेकर, गुरूदत्त कल्याणकर, केदार कणबर्गी, दर्पण आळवे, मनोज कल्याणकर, निलेश कदम, राजेश विर्नोडकर, भाऊ वाळके, श्रीधर सावंत, बाळा आकेरकर, कैलास गवस, उदय येडवे, समीर सावंत, विशांत पांगम, समीर कल्याणकर, सौ. पेडणेकर, सत्यनारायण गवस आदींसह भाजप–शिवसेना महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना सौ. श्वेता कोरगावकर यांनी जिल्ह्यातील महायुतीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील आणि जिल्हा परिषद तसेच आठही पंचायत समित्यांवर महायुतीचा झेंडा फडकेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला.
