*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम लेख*
*जरा विसावू या वळणावर*
अनेक थोर विभूतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला, जोग चौकातील पावन हॉल.
निमंत्रितांच्या उपस्थितीने गजबजलेला!
निमित्त होते श्री जगदिशजी सायसिकमल ह्यांच्या जरा विसावू या वळणावर पुस्तकाच्या श्रीगणेशजयंती च्या सुमुहूर्तावरील प्रकाशनाचे! वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित केलेला हा सोहळा! स्वतःच्या नावाचे सार्थक करणारी त्यांची कार्यशैली, अतिशय नम्र प्रेमळ स्वभाव, दुसऱ्याला निरपेक्ष भावनेने मदत करण्याची पद्धत! अशा गुणी सत्शील व्यक्तिने लिहिलेले हे 21 प्रकरणाचे पुस्तक! प्रामाणिकपणे जीवन जगणाऱ्या वडिलांना व रोज हरिपाठ करत जा सांगणाऱ्या आईला अर्पण केलेल्या ह्या पुस्तकाचे मुखपृष्ठ श्री श्रीकृष्ण ढोरे ह्यांनी खूप बोलके केले आहे. जीवनातल्या सर्व जबाबदाऱ्या नीट सांभाळून आता जरा विसावा मिळाला आहे, लक्ष पुढच्या प्रवासाकडे लागले आहे असे व्यक्त करणारे मुखपृष्ठ खूपच बोलके आहे.
मराठे मंडळी अपरिहार्य कारणामुळे उपस्थित राहू शकली नाही ! ही रुखरुख मनाला खूप जाणवली.
सर्व पाहुणे आल्यानंतर सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाल्यावर उषाताई शेरेकरांनी आपल्या सुस्वरात
गुरू ब्रम्हा गुरू विष्णू मंत्र आहे वेगळा हा स्वागताचा सोहळा हे गोड स्वागतगीत म्हटले.
व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांनी सौ.रेखाताई व जगदिशजी सायसिकमल ह्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. आदर्श समाजसेवक व उद्योगपती श्री सुदर्शनजी गांग व प्रसिद्ध समाजसेवक श्री गोविंदजी कासट दोघांनी मोत्याच्या माळा शाल श्रीफळ देत उभयतांचे पेढे देऊन अभिनंदन केले. सेवानिवृत्त कर्मचारी मंडळ, अभिनंदन मित्रमंडळ, त्यांचे शेजारी श्री अरविंद हिरुडकर, संजय शिरभाते, मंगलमूर्ती सोसायटीतर्फे सागर माहोरे अशा अनेक स्वजनांनी उत्सवमूर्तीचा सत्कार केला. ह्याच वेळी पुस्तक जुळवणी करणारे श्री निलेश वानखेडेंचा त्यांच्या अमूल्य सहकार्याबद्दल अतिशय आत्मीयतेने जगदिशजींनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. लक्ष वेधून घेतले ते शेंदुर्जनाघाट हुन आलेल्या अरुण फुटाणे यांनी! इतक्या दुरून ते केवळ कार्यक्रमासाठी आले होते. आणखी ही बरीच मंडळी जगदीशजींच्या पुस्तक प्रकाशनासाठी व वाढदिवसासाठी आलेली होती विशेष म्हणजे श्रीमती सुनिता ताई भेले, ललिता रतावा, मंजुषा जाधव व डॉ संजय शिरभाते ह्या चार नवनिर्वाचितांची
उपस्थिती असणारा हा पहिलाच कार्यक्रम असेल. ह्याचे कारण जगदीशजीचा लोकसंग्रह! विद्याताई माहोरेंच्या प्रास्ताविकानंतर आपल्या ओघवती भाषेत सूत्रसंचालन करीत असलेल्या मा. डॉ ऍड चापोरकर सरांनी व्यासपीठावर उपस्थित पाहुणे अखिल भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष मा. सुदर्शनजी गांग सर श्री डी डी देशमुख कल्पनाताई देशमुख डॉ गोविंद कासट ह्या मान्यवरांची ओळख करून दिली प्रत्येकाचे गुण विशेष ऐकून त्याच्याबद्दल असलेला आदर अधिकच वाढला त्याचाही यथोचित सत्कार करण्यात आला प्रा अनंत मराठे, दै हिंदुस्थानचे संपादक श्री उल्हास मराठे व प्रबंध संपादक श्री विलास मराठे अपरिहार्य कारणामुळे हजर राहू शकले नाही.तरी त्याच्या कार्याची तारीफ करत त्यांची आठवण काढल्या गेली.कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार आदरणीय न. मा. जोशी सरांचा शाल श्रीफळ मोमेंटो पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाल्यानंतर त्यांचा परिचय करूनदेतांना चापोरकर म्हणाले की वपु, पुल गदिमा अगदी तसेच नमा ओळख करून देतांना डॉ चापोरकरांच्या मित्रच असतो मित्रांचा आधार नेमका ,मित्राचा नसतो मित्रावर भार नेमका ह्या सुंदर गझल गायनाने सभागृह तल्लीन झाले आदरणीय न. मा. बद्दल बोलतांना त्यांनी न मा च्या उंचाई मेरी देखकर हैरान है लोग किसीने मेरे पावके छाले नही देखे ह्या
ओळीचा ही उल्लेख केला
कार्यक्रम जबरदस्त मोठा! वाढदिवस, पुस्तक प्रकाशन पाहुण्यांचा सत्कार ! मधूनच जगदिशजी वर प्रेम करणाऱ्या अनेक लोकांनी त्यांचा सत्कार केला नितीन कोल्हटकर मित्र मंडळ, रडके साहेब दिलीप डागा , किती नावे सांगणार?परंतु चापोरकर सरअतिशय सहजतेने हे सर्व हाताळत होते मध्येच नवनिर्वाचित सदस्यांचाही सत्कार झाला. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री न मा जोशी च्या हस्ते पुस्तकाचे टाळ्यांच्या कडकडाटात प्रकाशन झाले जगदिशजींनी मनोगतात पुस्तकाबद्दल आपली भूमिका मांडली अनेक अनुभव सांगितले ह्यानंतर विचारमंचावर उपस्थित मान्यवरांनी पुस्तक व जगदिशजी यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या प्रत्येकालाच बरेच सांगायचे असूनही वेळेच्या अभावी थोडक्यात पण स्मरणात राहतील अशी त्यांची काही विधाने अशी होती
प्रत्येक व्यक्ती म्हणजे एक पुस्तक, ते वाचायला शिकले पाहिजे,पत्रकार म्हणजे पवित्र कार्य करणारा, संधी मिळेल तेंव्हा काम केले पाहिजे जास्त ऐकावे कमी बोलावे . समीक्षक गोपाल उताणेच्या समीक्षणपर भाषणाने सभागृह प्रभावित झाले. ज्यांच्या विचारपुष्पांची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते ते अध्यक्ष श्री नमा ! वेळेचे भान ठेवून त्यांनीकेलेले अध्यक्षीय भाषण नेहमीच्या नर्म विनोदी पद्धतींमूळे सगळ्यांना आवडले. आभारप्रदर्शन बियाणी महाविद्यालयाच्या श्री दिलीप देशमुखांनी केल्यानंतर उषाताई शेरेकरांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली तब्बल तीन साडेतीन तास चाललेल्या ह्या कार्यक्रमाला उपस्थितांनी शेवटपर्यंत उपस्थित असणे हे कार्यक्रमाचे खासवैशिष्टय!
पुस्तक प्रकाशन, वाढदिवस अनेक होतात पण असा कार्यक्रम काही वेगळाच होता जगदिशजींनी आपल्यानम्र स्वभावाने किती माणसे जोडली आहेत याचे प्रत्यंतर आले पुस्तकाच्या मनोगतात ते म्हणतात, जीवनाची तीन पाने , जन्म मृत्यु आणि जीवन। यापैकी जीवन हे एकच पान आपल्या हातात असते कसं जगायचं ते आपण च ठरवायचंअसतं, आदरणीय श्री प सि काणे निवृत्त प्राचार्य डॉ माणिक पाटील, प्रा सौ कल्पनाताई देशमुख समाजसेवक डॉ गोविंद कासट अशा मान्यवरांनी पुस्तकाबद्दल शुभेच्छापर आशीर्वाद द्यावेत यातच लेखकाचे मोठेपण दिसून येते या कार्यक्रमामुळे खूप आनंद मिळाला
जगदिशजी सायसिकमल ह्यांना दुसऱ्या पुस्तकासाठी अनेक शुभेच्छा…!
