You are currently viewing वरदान की शाप

वरदान की शाप

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*वरदान की शाप* 

 

ए. आय्.च्या जाळ्यात कवी अडकला

आयतं वाढलेलं ताट मिळालं जेवायला

इन्स्टंट फास्ट फूड घेतलं ताटात वाढुन

आणि स्वतःचीच पाठ घेतली थोपटून

 

आता नकोच मेंदूला अजिबात ताण द्यायला

ए. आय. रुपी मौल्यवान खजिना हाती गवसला

आयुष्याला तर आली मस्त एकदमच गती

पण आराम करून सुस्त झाली स्वतःची मती

 

मात्र मानवाचं शेपूट का गळून पडलं हे आठवल्यावर

कवी आला तेव्हा अचानक भानावर

निरुपयोगी वस्तूंची होते नाहीशी अडगळ

क्रियाशीलतेलाच मिळते सृजनतेचे बळ

 

कुठलेही नवीन संशोधन उपयोगीच असतं

ते वरदान की शाप हे आपल्याच हातात फक्त

शेवटी भावभावनांची व्यक्तता हे वैशिष्ट्य मानवाचं

शेवटचा उपाय म्हणून गरजेपुरतंच वापरावं हे साधन ए. आय्.चं

 

@भारती महाजन-रायबागकर चेन्नई

©® या स्वरचित कवितेचे हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा