*कणकवलीच्या सुप्रिया प्रभुभिराशी यांना भारत कला गौरव पुरस्काराने सन्मानित*
*कणकवली
इचलकरंजी–कोल्हापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय प्रेरणा किरण गौरव सन्मान सोहळा २०२६ मध्ये कणकवली येथील मा. सौ. सुप्रिया प्रभुभिराशी यांना “भारत कला गौरव पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले.
राजमाता जिजाऊसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या सोहळ्यात, कला व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्याबद्दल त्यांची निवड करण्यात आली होती. विविध क्षेत्रांत त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण योगदानाची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.
२५ जानेवारी २०२६ रोजी फॉर्च्युन सिनेप्लेक्स, इचलकरंजी (कोल्हापूर) येथे झालेल्या या भव्य समारंभात प्रसिद्ध सिनेअभिनेत्री मा. प्रतिक्षा लोणकर यांच्या शुभहस्ते सुप्रिया प्रभुभिराशी यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सन्मानामुळे कणकवली तालुक्याच्या नावलौकिकात भर पडली असून, सर्व स्तरातून सुप्रिया प्रभुभिराशी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
