You are currently viewing कणकवलीत ठाकरे सेनेला जोरदार धक्का; वागदे ग्रामपंचायत सदस्यांसह पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश
Oplus_16908288

कणकवलीत ठाकरे सेनेला जोरदार धक्का; वागदे ग्रामपंचायत सदस्यांसह पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

बिनविरोध उमेदवारीनंतर पालकमंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेशांचा सपाटा

कणकवली :

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून बिनविरोध विजयांची मालिका सुरू असतानाच, कणकवली मतदारसंघात ठाकरे सेनेला मोठे खिंडार पडले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या राजकीय हालचालींमुळे ठाकरे गटाला सातत्याने धक्के बसत असून, वैभववाडीनंतर आता कणकवली तालुक्यातील वागदे ग्रामपंचायतीतून मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाले आहेत.

वागदे ग्रामपंचायतीचे ठाकरे गटाचे सदस्य दशरथ गावडे यांच्यासह माजी शाखाप्रमुख रवी गावडे, संतोष घाडीगावकर, मनोज गावडे, शांताराम गावडे, अनंत गावडे आणि राजू गावडे आदी पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्व नवप्रवेशितांचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पक्षात स्वागत केले.

यावेळी वागदे ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप सावंत, लक्ष्मण घाडीगावकर, समीर प्रभूगावकर, गोविंद घाडीगावकर, भाई काणेकर यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कणकवली मतदारसंघात भाजपाची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम होत असून, ग्रामपंचायत पातळीवरही पक्षाचा प्रभाव वाढताना स्पष्टपणे दिसून येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा