You are currently viewing “वंदे मातरंम.. वंदे मातरंम्..”
Oplus_16908288

“वंदे मातरंम.. वंदे मातरंम्..”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

“वंदे मातरंम.. वंदे मातरंम्..”

मम प्रिय भारत देशा.. वंदे मातरंम…

 

युगे युगे तू आदर्शाचा खरा वारसा आहे

सांग बरे या विश्वामाजी तुजसम कोण आहे?

खूप सोसली अतिक्रमणे होरपळला प्राण…

 

अस्मिता ना गमावली ग ताठ सदा राहिली

राणा प्रताप झाशीवाली रूपे तुझी पाहिली

देत राहिली सदा तरीही सन्मार्गाचे दान…

 

इतिहासातील साऱ्या जखमा अंगावर मिरविशी

तूच आमुची आहे पद्मिनी तूच आमुची काशी

ठाई ठाई महाल इमले तव कार्याची शान…

 

निष्ठा आई तुझ्या पायी ग विसंबू ना तुला

उंच उंच ग जातो आहे तव कार्याचा झुला

विश्वशक्ती तू बनून आहे उठले आहे रान…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा