मनीष दळवी व शीतल राऊत यांची श्री देवी सातेरीचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात
वेंगुर्ला :
वेंगुर्ला तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ आज वेतोरे ग्रामदेवता श्री देवी सातेरीच्या दर्शनाने झाला. आडेली जिल्हा परिषद सदस्य पदासाठी रिंगणात असलेले जिल्हा बँक अध्यक्ष मनीष प्रकाश दळवी तसेच वायंगणी पंचायत समिती सदस्य पदासाठी उमेदवार शीतल राऊत यांनी श्री देवी सातेरीचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली. यावेळी मनीष दळवी यांनी श्री देव वेतोबाचेही दर्शन घेतले.
या प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक, वेतोरे सरपंच प्राची नाईक, भाजप तालुका उपाध्यक्ष दिपक नाईक, भाजप जिल्हा निमंत्रित सदस्य साईप्रसाद नाईक, वेंगुर्ला तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन झानेश्वर केळजी, दाभोली सरपंच उदय गोवेकर, श्रीकृष्ण बांदवलकर, वेतोरे उपसरपंच तुषार नाईक, ग्रा. पं. सदस्य नितीन गावडे, विरोचन धुरी, विनायक गावडे, संतोषी गावडे, संगिता नाईक, साक्षी राऊळ, विक्रांत सावंत, सुधीर गावडे, प्रशांत नाईक, सुजाता वालावलकर, भाजप युवा नेते सौरभ समीर नाईक, प्रशांत प्रभुखानोलकर, यतिन आवळेगावकर, विजय वालावलकर, संदीप नाईक, यशश्री नाईक, प्रकाश गावडे, योगेश नाईक, सीताबाई शिरोडकर, सिद्धेश राऊळ, सातेरी वाचनालयाचे उपाध्यक्ष राधाकृष्ण वेतोरकर आदींसह भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री देवी सातेरीच्या आशीर्वादाने तसेच जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेच्या सहकार्यामुळे महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास मनीष दळवी यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी वेतोरे ग्रामस्थांच्या वतीने मनीष दळवी यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
