अभिनेते दिगंबर नाईक यांची श्री शिवछत्रपती माध्य.विद्या. असनिये प्रशालेस सदिच्छा भेट.
दोडामार्ग
मराठी नाटक, मालिका, सिनेमा त्याचप्रमाणे विविध कार्यक्रमातील स्किटमध्ये विनोदी भूमिका आणि स्व.मच्छिंद्र कांबळे यांनी अजरामर करुन ठेवलेली ‘ वस्त्रहरण’ नाटकातील तात्यांची भुमिका तितक्याच समर्थपणे साकारून घराघरात पोचलेले, प्रसिद्ध अभिनेते दिगंबर नाईक यांनी आज श्री शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय असनिये याप्रशालेस सदिच्छा भेट दिली. एका मराठी मालिकेच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने असनिये गावात ते आले होते. विद्यार्थ्यांशी त्यांनी मनमोकळेपणानी संवाद साधला. त्यांच्या सोबत फोटो ,त्यांचा आॅटोग्राफ घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उस्ताह दिसुन येत होता. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना खास मालवणी शैलीत विद्यार्थ्यांच्या प्रगतिसाठी गार्हाणेही घातले.
विशेष म्हणजे अभिनय करताना त्यांनी आपला मालवणी बाज कायम ठेवला. जिथे संधी मिळेल तिथे मालवणी भाषा आवर्जुन बोलायची, हा त्यांचा शिरस्ता आहे. “विच्छा माझी पूरी करा’, “भटाच्या साक्षीने’, “अर्धी मस्ती अर्धा ढॉंग’, “मिस्तर नामदेव म्हणे’, “लाडीगोडी’ यासारखी अनेक नाटके तर “गाव गाता गजाली’, “फू बाई फू’, “बिग बॉस’ यासारखे अनेक रिआलीटी शो आणि अनेक चित्रपटांतून त्यांचा अभिनय पहायला मिळाला. अनेक महोत्सवातून त्यांच्यातील अस्सल मालवणी कलावंत पहायला मिळतो.
निसर्गरम्य अशा असनिये गावातील या प्रशालेस भेट दिल्याचा विशेष आनंद झाला असा आवर्जुन उल्लेख केला. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम.सावत मॅडम, श्री.संजय सावंत , श्री.राठोड सर, श्री.देसाई सर व इतर कर्मचारी उपस्थित होते.

