कुडाळ / प्रतिनिधी :
कुडाळ येथे आज शिंदे शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी कुडाळ येथील शिंदे शिवसेना महायुती कार्यालयात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संजय पडते, काका कुडाळकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, उपतालुकाप्रमुख देवेंद्र नाईक, सागर वालावलकर, संजय भोगटे, रोहित भोगटे, प्रसन्ना गंगावणे, राजवीर पाटील आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
