*चिंतेत असलेल्या प्रशांत राजाराम कदम यांना साईकृपा संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सर यांचे बहुमलाचे सहकार्य*
देवगड
प्रशांत राजाराम कदम राहणार आंबेखोल,शिरगाव तालुका देवगड येथील रहिवासी आहेत.ते 75 टक्के दिव्यांग आहेत. त्यांना इंदिरा आवास योजनेतून घर मंजूर झालेलं होतं. घराच काम थोड राहिल्याने त्यांना सिमेंटची आवश्यकता होती.त्यांनी एका विश्वासाने सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल शिंगाडे सर यांना विनंती केली की आम्हाला सिमेंटची आवश्यकता आहे. श्री.अनिल शिंगाडे यांनी कोणताही विचार न करता तेथे धाव घेतली व त्यांना मदतीचा हात पुढे केला.आणि त्यांना 10 पोती सिमेंट नेऊन दिले.त्यामुळे प्रशांत कदम यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याबद्दल प्रशांत कदम यांनी साईकृपा संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल शिंगाडे सर व साईकृपा संस्थेचे आभार मानले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था ही वेळोवेळी दिव्यांग बांधवांसाठी मायेचा आपुलकीचा हात देऊन त्यांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करत असते.
