पावशी जि.प. मतदारसंघात ठाकरे गटाची ताकद दाखल;
अमरसेन सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल
कुडाळ
कुडाळ तालुक्यातील महत्त्वाचा समजला जाणारा पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीकडून अमरसेन सावंत यांनी आज अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे त्यांनी आपला अर्ज सादर केला.
याचवेळी डिगस पंचायत समिती गणासाठी ठाकरे शिवसेनेचे उमेदवार नारायण उर्फ आप्पा मांजरेकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला.
अर्ज दाखल करताना अणाव ग्रामपंचायतीचे सरपंच लिलाधर अणावकर, डिगस उपसरपंच रूपेश पवार, मंदार कोठावळे यांच्यासह शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेमुळे परिसरात राजकीय हालचालींना वेग आला आहे.
