मिलाग्रीसच्या क्रीडा शिक्षिका शेरॉन अल्फान्सो यांचे घवघवीत यश! ;
शिक्षक व अधिकार्यांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत भालाफेक क्रीडा प्रकारांत अव्वल!
सावंतवाडी :
महाराष्ट्र शासन-शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आयोजित शिक्षक व अधिकारी स्पर्धा आयोजित केलेल्या विविध शिक्षक स्पर्धांमध्ये मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडीच्या क्रीडा शिक्षिका श्रीम. शेरॉन अल्फान्सो यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्या गोवा युनिव्हर्सिटीमध्ये सलग चार वर्ष भालाफेक प्रकारात गोल्ड मेडलिस्ट असून नुकत्याच कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय भालाफेक या क्रीडा प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. राज्यभरातून आलेल्या तब्बल 33 स्पर्धकांमधून त्यांनी हे अभूतपूर्व यश प्राप्त केले आहे.
राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करून शाळेचे जिल्ह्याचे तसेच विभागाचे नाव राज्यस्तरापर्यंत उंचावल्याबद्दल सगळीकडून त्यांच्यावर अभिनंदन याचा वर्षाव होत आहे.
प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदाना, पर्यवेक्षिका श्रीम.संध्या मुणगेकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व पालक वर्ग यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
