You are currently viewing वेताळबांबर्डे जि.प. मतदारसंघात शिवसेनेची चाल; नागेश आईर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Oplus_16908288

वेताळबांबर्डे जि.प. मतदारसंघात शिवसेनेची चाल; नागेश आईर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

कुडाळ :

कुडाळ तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच वेताळबांबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे उमेदवार नागेश आईर यांनी आज मोठ्या उत्साहात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाने त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे आणि मतदारसंघातील मजबूत जनसंपर्कामुळे ही निवडणूक चुरशीची ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

यापूर्वीच शिवसेनेकडून नागेश आईर यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर पक्षाचा ‘एबी फॉर्म’ देण्यात येताच त्यांनी अधिकृतपणे निवडणूक रिंगणात प्रवेश केला. त्यांच्या उमेदवारीमुळे वेताळबांबर्डे मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून प्रचाराला वेग आला आहे.

नागेश आईर यांचा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असून सामाजिक व सार्वजनिक कार्यातील सक्रिय सहभाग ही त्यांची ओळख आहे. सर्वसामान्यांशी थेट संपर्क, कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे आणि पक्षसंघटनेचा भक्कम पाठिंबा यामुळेच पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीत वेताळबांबर्डे मतदारसंघात मोठी चुरस पाहायला मिळणार, हे निश्चित मानले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा