You are currently viewing सिंधुदुर्ग शिवसेना (शिंदे गट), भाजपा नेत्यांमध्ये दिलजमाई

सिंधुदुर्ग शिवसेना (शिंदे गट), भाजपा नेत्यांमध्ये दिलजमाई

आता सारे काही आलबेल; बबन शिंदे

 

कुडाळ:

शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात आता सारे काही आलबेल आहे, असे शिंदे गटाचे कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघ प्रमुख बबन शिंदे आणि मालवण तालुका प्रमुख राजा गावकर यांनी सांगितले. शिवसेना शिंदे गट कुडाळ- मालवण तालुका आणि भाजप पदाधिकारी यांची समन्वय गुप्त बैठक आज कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे झाली. या बैठकीत शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी तक्रारींचा पाढाच वाचला. महायुती मध्ये आम्हाला सावत्र भावाची नाही तर सख्या भावाची वागणूक अपेक्षित आहे असा सूर शिवसेना पदाधिकऱ्यातून बाहेर आला. या बैठकीला भाजपच्या वतीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तसंच शिवसेना शिंदे गटाच्या वतीने किरण उर्फ भैय्या सामंत, जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख वर्षा कुडाळकर, जिल्हा समन्वयक रुपेश पावसकर, मालवण- कुडाळ विधानसभा मतदारसंघ प्रमुख बबन शिंदे, मालवण तालुकाप्रमुख राजा गावकर उपस्थित होते. भाजप आणि शिंदे गटात रंगलेला कलगीतुरा अखेर संपुष्टात आला. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी यावर तोडगा काढत दिलजमाई करण्यात यश मिळवले. बैठकीनंतर शिंदे गट आणि भाजपा यांच्यामध्ये समन्वय झाल्याचं सांगण्यात आलं. आगामी लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठ्या संख्येने निवडून देऊन नरेंद्र मोदी यांचा अबकी बार ४०० पार चा नारा यशस्वी करून त्यांना पंतप्रधान करू असा विश्वास यावेळी बबन शिंदे आणि राजा गावकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा