You are currently viewing मणेरी पंचायत समितीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून प्रीती धुरी मैदानात

मणेरी पंचायत समितीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून प्रीती धुरी मैदानात

मणेरी पंचायत समितीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून प्रीती बाबुराव धुरी मैदानात

दोडामार्ग

दोडामार्ग तालुक्यातील विविध जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यात विविध पक्षांचे व अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

दोडामार्ग–माटणे जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे सावंतवाडी विधानसभा उपाध्यक्ष रविकिरण गवस यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

साटेली–भेडशी जिल्हा परिषद मतदारसंघात सौ. दिपिका मयेकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत अर्ज भरला आहे.

दरम्यान, मणेरी पंचायत समिती मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे सौ. प्रिती बाबुराव धुरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या मतदारसंघातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा