You are currently viewing श्री पंचम खेमराज महाविद्यालयात खाद्यमहोत्सव संपन्न.

श्री पंचम खेमराज महाविद्यालयात खाद्यमहोत्सव संपन्न.

श्री पंचम खेमराज महाविद्यालयात खाद्यमहोत्सव संपन्न.

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी खाद्य महोत्सवाचा आयोजन करण्यात आले होते. या खाद्य महोत्सवाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त व सावंतवाडी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा युवराज्ञी सौ.श्रद्धाराजे लखमसावंत भोंसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे कार्यकारीणी सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,डॉ. सतीश सावंत, सहसंचालक अॅड. शामराव सावंत ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल, सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या खाद्यमहोत्सवामध्ये विद्यार्थ्यांनी
चिकन बिर्यानी,व्हेज पॅटीस, चिकन पॅटीस, भजी, फ्रुटज्युस,मटन भाकरी, स्विट काॅर्न, शिरवाळे, आईसक्रीम,भेळ,थंडपेय, सरबत,गुलाबजाम, कोल्हापुरी भेळ, पाणीपुरी ,शेवपुरी, दही वडा, इत्यादी पारंपरिक पदार्थ विक्रीसाठी ठेवले होते. विद्यार्थी व शिक्षकांनी तसेच महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी या खाद्य महोत्सवाला उत्कृष्ट प्रतिसाद दिला. संस्थेच्या विश्वस्त युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोसले यांनी सर्व स्टॉल्सला भेटी देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले व या उपक्रमाचे कौतुक केले. या खाद्यमहोत्सवाच्या यशस्वीतेसाठी डाॅ.डी.जी.बोर्डे, डाॅ.एस.एम बुवा, डॉ.एस ए देशमुख, डॉ.वाय पवार ,प्रा. आर के शेवाळे, प्रा हर्षदा परब, प्रा.मिथिका वर्दम यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा