You are currently viewing कशाला एआय चे कौतुक करता

कशाला एआय चे कौतुक करता

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कशाला एआय चे कौतुक करता*

 

ए आय च्या जाळ्यात अडकला कवी

*उगाच करताय आरोप कवीवर*

खपवून नाही घेणार आमची मैत्रीण

जोड्याने मारेल ती हमरस्त्यावर …1

 

वाट नाही पहायची *समृध्दीची*

हाणेल दोनचार जिथल्या तिथे

एआयच्या जाळ्यत नाही फसणार

एआयला पुरवेल शब्द *तिथे*……2

 

अजून आहे खोबडी भरलेली

नाही मागत शब्द *उधार*

स्पर्धेत पाठवते कविता शेकडो

नाही स्वीकारत प्रमाणपत्र टुकार…3

 

एआय मागते शब्द तिच्याजवळ

वेण्णा कृष्णेत मारून *डुबकी*

तीच पुरविते पवित्र *शब्दमाला*

आमच्या गावची ती *लडकी*……4

 

नाही लागला *गळाला* कोणी

भांडार आहे *शब्द संपत्तीचे*

हवी कशाला ती उसनी शिदोरी

पुरवू डोहाळे एआय प्रणालीचे……5

 

असून भूमी ही ज्ञानदेव माऊलींची

शब्दांनी वहातात तुडुंब सरीता

वेडे आहोत कां आंम्ही *कवी*

कशाला एआयचे कौतुक करता..6

 

विनायक जोशी 🖋️ठाणे

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा