धाराशिव :
धाराशिव येथील काव्यांगण साहित्य मंच महाराष्ट्राच्या वतीने 18 जानेवारी 2026 रोजी उमरगा येथील आदर्श महाविद्यालयाच्या सभागृहात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
संमेलणाचे उदघाटन कॉलेज चे प्राचार्य. सोलंकर सर, सैफन शेख, डॉ. कल्पना वाघ व समूहाचे संस्थापक अध्यक्ष विकास राठोड,उपाध्यक्ष आयान मौजन,सचिव वृंदा गंभीर,संचालक मा. के. पी. बिराजदार यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा पार पडला. त्यानंतर महाराष्ट्रातील युवा कवींनी आपल्या बहारदार कविता सादर केल्या.
त्याच सोबत काव्यदीप या प्रातिनिधीक काव्यसंग्रहाचे देखील प्रकाशन करण्यात आले. या काव्य संग्रहात एकूण पन्नास कवीनि सहभाग नोंदविला.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेल्या निमंत्रीत कवीनी प्रेम आई,निसर्ग जीवन मैत्री अश्या अनेक विषयावर विविध प्रकारच्या कविता सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
काव्य संमेलनाचे अध्यक्ष विकास राठोड यांनी समाजामध्ये काव्य,नाटक,कथा, कादंबऱ्या,चित्रपट,नाटके,तमाशा अशा विविध पैलूंनी संस्कृती सजत असते म्हणून युवा पिढीने यामध्ये सक्रिय होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. डॉक्टर कल्पना वाघ यांनी संस्कृतीच्या विकासामध्ये युवा पिढीचा सहभाग या विषयावरती आपले मनोगत व्यक्त केले.
कवी संमेलन यशस्वी करण्यासाठी सलीम मौजन,अमोल राठोड, अमान,शाहिद,अभय,यांनी परिश्रम घेतले. त्याच बरोबर सई शिंदे,सुदर्शन जोशी,स्वप्नील कांबळे यांनी सूत्रसंचलन करून संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.
वरील 51 कवीने आपल्या कविता सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.
आलेल्या सर्व कविनी विचारपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल समुह संस्थापक विकास राठोड यांचे आभार व्यक्त केले.तर आलेल्या सर्व कवीना सन्मान चिन्ह,सन्मान पत्र,आणि काव्य दीप हे प्रातिनिधिक कवींचे पुस्तकं देऊन समुहाच्या वतीने गौरविण्यात आले…
