सावंतवाडी येथील दैवज्ञ गणपती मंदिरात २१ जानेवारीपासून विविध रेलचेल.
सावंतवाडी:
येथील श्री देव दैवज्ञ गणपती मंदिर उभाबाजार येथे गणपती मूर्ती प्रतिष्ठापना 36 वा वाढदिवस तसेच सालाबाद प्रमाणे माघी गणेश जयंती, नारायण स्वामी पुण्यतिथी व बालाजी उत्सव साजरे केले जाणार आहेत.
त्यानिमित्ताने पुढील कार्यक्रम आयोजित केले आहेत –
बुधवार दिनांक 21 जानेवारी 2026 सकाळी 9:30 वाजता गणपती मूर्ती श्री ची पूजाअर्चा, वाढदिवस, गणपती अथर्वशीर्षसहस्त्रावर्तने,जप व हवन व रात्रौ भजन.
गुरुवार दिनांक 22 जानेवारी 2026 सकाळी श्रींची पूजा अर्चा, अभिषेक वगैरे सकाळी 10:30 वाजता गणेश जन्मावर किर्तन, दुपारी बारा वाजता गणेश जन्म , दुपारी 12:30 ते रात्रौ नऊ वाजेपर्यंत गणेश नामजप व रात्रौ नऊ नंतर भजन.
शुक्रवार दिनांक 23 जानेवारी 2026 सकाळी श्री नारायण स्वामींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने श्रींची पूजाअर्चा व नंतर स्वामींची समाधी व पादुका पूजन.
सकाळी अकरा वाजता पावणी व त्यानंतर महाप्रसाद व रात्रौ भजन.
शनिवार दिनांक 24 जानेवारी 2026 सकाळी बालाजी मठात श्रींची पूजाअर्चा व नंतर स्वामींची समाधी व पादुकापूजा, अभिषेक व रात्रौ भजन वरील सर्व कार्यक्रमास सर्व गणेश भक्तांनी हजर राहून प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उत्सव समिती श्री दैवज्ञ गणपती मंदिर सावंतवाडी यांनी केले आहे.
