*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अरे संसार संसार*
अरे संसार संसार
कशी झाली उपासमार
दोन जीवा लागे घोर
दिवसभर कष्टाची मरमर
परि ना मिळे पैसे चार
घरी उपाशी पोरसोरं…
आहे मी इमानदार
ना उसनवार ना घेणार उधार
खाल्या मिठाला जागणार
ना भ्रष्ट ना इमान विकणार
मी जर्जर त्रासून झालो बेजार
जरी प्राण आला कंठावर
बाहेर प्रकाश प्रखर
आत अंधार अंधार…
अरे संसार संसार
करतो सत्याचा स्विकार
विश्वास ठेवतो दुसऱ्यावर
व्याज खातो सावकार
सडते धान्याची वखार
भरते भ्रष्टाचाऱ्याचे घर
संत सांगती सुविचार
गुंडांच्या मनी कुविचार
बिचारा भिकारी मागतो भाकर…
अरे भाकर भाकर
मिळते का गरीबा पोटभर
जनतेच्या मतावर चालते सरकार
बसून खुर्चीवर अधिकारी मुजोर
गरीबांच्या पोटाची गय होणार
मग सांगा देश माझा
कसा कधी प्रगत होणार
अरे संसार संसार…
अरे संसार संसार….
कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७७.
