You are currently viewing देवत्व…!

देवत्व…!

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रज्ञा घोडके लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*देवत्व..!*

 

तुझे अस्तित्वच असे

मनामध्ये उतरले

चंद्र-तारे चमकुनी

मनतळी पोहचले

 

तुझी आकर्षक छबी

जणू प्रतिष्ठा लाभली

नशा दुनियेची आहे

तुझ्या डोळ्यातही ओली

 

ह्याच मधु गुंजनात

मन माझे कैद झाले

जसे चुकले भ्रमर

फुलातच ते गुंतले

 

आस मनोमिलनाची

भाव रात्रीला मिळाले

स्वप्नातील स्वर्गाभास

दर्पणात उतरले

 

मनाचीही नदी होते

येता ऋतूंचा बहर

हेच देवत्व ते खरे

उमगते धरेवर

 

प्रज्ञा घोडके,पुणे©®

प्रतिक्रिया व्यक्त करा