विलास व प्रियांका परब यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा;
आदिवासी व वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक व जीवनोपयोगी साहित्य वाटप
कणकवली
भारत सरकारचे नोटरी तथा ओसरगावचे सुपुत्र आणि जिल्ह्यातील नामवंत वकील श्री. विलासजी परब साहेब यांचा वाढदिवस आज नाग्या महादू वसतिगृह व शाळेत सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त श्री. उदय आईर, संस्थेचे सर्व कर्मचारी, वानरमारी समाज, कातकरी समाज, आदिवासी समाज तसेच समाजातील वंचित व शोषित घटकांतील शिक्षण घेत असलेली मुले मोठ्या संख्येने उपस्थित होती.
वाढदिवसानिमित्त संपूर्ण परब परिवाराच्यावतीने वकील श्री. विलासजी परब साहेब व वकील सौ. प्रियांका परब यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक दैनंदिन जीवनातील वस्तू, खाऊ, चॉकलेट व इतर उपयुक्त साहित्य संस्थेचे विश्वस्त श्री. उदय आईर यांच्याकडे सुपूर्द केले.
जगात अनेकजण आपला वाढदिवस विविध पद्धतीने साजरा करतात; मात्र गावातील या दोन्ही वकिलांनी सामाजिक बांधिलकी जपत एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला असल्याचे उपस्थितांनी गौरवोद्गार काढले.
या कार्यक्रमास वकील तुषारजी, वकील भालचंद्रजी, माजी उपसरपंच श्री. चंद्रहास उर्फ बबली राणे तसेच परब फॅमिली उपस्थित होती. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून परब परिवारावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.
