You are currently viewing रत्नागिरीत महिलांसाठी रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षणाला सुरुवात

रत्नागिरीत महिलांसाठी रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षणाला सुरुवात

बाया कर्वे स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटमध्ये फेब्रुवारी २०२६ पासून ड्रेस मेकिंग व ब्युटी कल्चर अभ्यासक्रमांचे प्रवेश

रत्नागिरी :

महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ – MSBSVET मान्यताप्राप्त) येथे विद्यार्थिनी व महिलांसाठी अल्पमुदतीचे, रोजगाराभिमुख प्रशिक्षण अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू झाले असून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे स्किल डेव्हलपमेंट इंस्टीट्युट, मारुती मंदिर रत्नागिरी येथे प्रवेश देण्यास सुरवात झाली आहे. कौशल्याधारित शिक्षणाद्वारे स्वावलंबन व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा संस्थेचा उद्देश आहे.

संस्थेमध्ये सर्टिफिकेट कोर्स इन ड्रेस मेकिंग (प्रवेश पात्रता – ७ वी पास) तसेच सी.सी. इन प्रोफेशनल कोर्स इन ब्युटी कल्चर अँड हेअर ड्रेसिंग (प्रवेश पात्रता – १२ वी पास) हे दोन अभ्यासक्रम फेब्रुवारी २०२६ पासून सुरु होणार असून दोन्ही अभ्यासक्रमांचा कालावधी ६ महिने असून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शासनमान्य प्रमाणपत्र दिले जाईल. यासाठी 25 प्रवेश मर्यादित आहेत. या प्रशिक्षणाचा लाभ अर्धवट शिक्षण सोडलेल्या महिला, कॉलेज मध्ये जाणाऱ्या मुली व मुलींना होणार आहे. बाया कर्वे स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या अधिकृत अनुभवी प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणासाठी बाहेरगावातील विद्यार्थिनीना संस्थेच्या विद्यार्थिनी वसतिगृहात निवास व मेस सुविधा सशुल्क उपलब्ध करून दिली जाईल.

या अभ्यासक्रमाला ऑनलाइन पद्धतीने प्रवेश दिले जाणार असून रत्नागिरी जिल्ह्यातील इच्छुक महिलां उमेदवाराना https://msbsvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी संस्थेचा संकेतांक क्रमांक

MSB050201 -निवडावा. तसेच नोंदणी व माहितीसाठी बाया कर्वे स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, शॉप नं. २०२ ते २०६, नलावडे कमर्शियल सेंटर, पहिला मजला, मारुती मंदिरजवळ, रत्नागिरी येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा किंवा ७४९९८२१३६९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा