जिल्हा परिषद–पंचायत समितीच्या सर्व जागा एकसंघपणे लढवण्याचा निर्धार, इच्छुक उमेदवारांवर सखोल चर्चा
देवगड :
सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी देवगड तालुक्याची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत तालुक्यातील प्रत्येक विभागानुसार कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांची नावेही नोंदवण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते नंदुशेट घाटे यांची भेट घेऊन निवडणूक तयारीबाबत चर्चा करण्यात आली. महाविकास आघाडीच्या माध्यमातून शांततेच्या मार्गाने, एकसंघपणे निवडणूक यंत्रणा राबवून यश संपादन करावे, अशा स्पष्ट सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या.
बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवायच्या असा एकमताने ठराव करण्यात आला. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी कार्यकर्त्यांचा आढावा घेत इच्छुक उमेदवारांची नावे संकलित केली.
या बैठकीला उपजिल्हाप्रमुख संदीप कदम, तालुकाप्रमुख रविंद्र जोगल, जयेश नर, युवासेना तालुकाप्रमुख गणेश गांवकर, युवक काँग्रेसचे किरण टेंबूलकर, मनसेचे उपजिल्हाप्रमुख चंदन मेस्त्री, उपतालुकाप्रमुख दादा सावंत, महिला उपजिल्हाप्रमुख प्रतिक्षा साटम, महिला तालुकाप्रमुख सौ. हर्षा ठाकूर, सौ. वर्षा पवार, विभागप्रमुख रेश्मा सावंत, श्रीकांत गांवकर, मंगेश फाटक, विष्णु घाडी, रमाकांत राणे, बाजीराव जाधव, प्रसाद दुखंडे, शिवदास नरे, शहरप्रमुख तथा नगरसेवक विशाल मांजरेकर, शहरप्रमुख रिया शेडगे, गणेश कांबळी, सुनिल तिर्लोटकर, निनाद देशपांडे, सुधीर तांबे, गणेश जेठे, प्रशांत साटम, दिनेश लाड, जयवंत गिरकर, भास्कर गावरवडकर, कृष्णा विरकर, सिताराम प्रभु, शांताराम घाडी, सुरेश जाधव, अभिषेक कदम, संतोष मणचेकर, जगन्नाथ गुरव, वसंत पाटील, उमेश पवार, शशांक तावडे, राजन दहिबावकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीमुळे देवगड तालुक्यातील महाविकास आघाडीची निवडणूक तयारी अधिक गतिमान झाल्याचे स्पष्ट दिसून आले.
