*भाजपा प्रणित सेवा शक्ती संघर्ष एस.टी.कर्मचारी संघाच्या वेंगुर्ले आगार अध्यक्ष पदी प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांची निवड. तर कार्याध्यक्षपदी विष्णु उर्फ पपु परब यांची निवड.*
वेंगुर्ले
भाजपाप्रणित सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ वेंगुर्ला आगार २०२६ ची कार्यकारणी ची सभा भाजपा कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वेंगुर्ले भाजपा कार्यालयात घेण्यात आली .
या वेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रसंन्ना देसाई यांची आगार अध्यक्षपदी निवड करण्यात आली . तसेच आगार कार्याध्यक्ष पदी भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष श्री विष्णू परब यांची निवड करण्यात आली . तसेच वेंगुर्ला आगार सचिव पदी श्री महादेव चंद्रकांत भगत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच वेंगुर्ला आगार उपाध्यक्ष पदी श्री विजय कोरे व श्री मकरंद होळकर यांची निवड करण्यात आली,
वेंगुर्ला आगार सहसचिव पदी श्री वैभव मांजरेकर, तसेच महिला संघटक सचिव पदी श्री सेजल रजपूत व सिद्धी परब यांची निवड करण्यात आली , संघटक सचिव पदी श्री रोहन नांदोस्कर व श्री रुपेश तेंडुलकर यांची निवड करण्यात आली.सर्व पदाधिकारी यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यकारणी निवड कार्यक्रमा प्रसंगी भाजपा कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री अशोकजी राणे यांनी कामगारांना मार्गदर्शन करताना कर्मचाऱ्यांनी संघटना वाढीसाठी प्रयत्न करत असताना कामगारांचे प्रश्न सोडवून आपल्या संघटनेचा विश्वास वाढवा , असे आवाहन केले .
यावेळी सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ विभागीय सचिव श्री भरत चव्हाण, विभागीय सहसचिव श्री स्वप्नील रजपूत, विभागीय पदाधिकारी श्री रोशन तेंडुलकर साहेब , श्री संजय सावंत साहेब, श्री प्रशांत गावडे साहेब उपस्थित होते. सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ वेंगुर्ला आगार सभासद, श्री दाजी तळवणेकर, श्री सखाराम सावळ,मिलिंद मयेकर, मनोहर वालावलकर, निखिल भाटकर, अक्षय येसाजी, अनंत झोरे, प्रकाश मोहिते, मनोज दाभोलकर, विनायक दाभोलकर, आशिष वराडकर, तेजस जोशी, इतर कर्मचारीही उपस्थित होते .
