You are currently viewing जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजपाची उद्या दोडामार्गात महत्त्वाची बैठक

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजपाची उद्या दोडामार्गात महत्त्वाची बैठक

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजपाची उद्या दोडामार्गात महत्त्वाची बैठक

दोडामार्ग

दोडामार्ग तालुक्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची एक महत्त्वपूर्ण बैठक उद्या, गुरुवार दि. १५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता भाजपाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीसाठी जिल्हा पातळीवरील सर्व पदाधिकारी, नगराध्यक्ष, तालुका पदाधिकारी, विद्यमान व माजी सरपंच, नगरसेवक, बूथ अध्यक्ष तसेच शक्ती केंद्र प्रमुखांनी आवर्जून आणि वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपाचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष दिपक गवस यांनी केले आहे.
आगामी निवडणुकांच्या तयारीसंदर्भात पक्षाची संघटनात्मक बांधणी, निवडणूक रणनीती तसेच कार्यकर्त्यांची जबाबदारी व भूमिका यावर सखोल चर्चा या बैठकीत होणार आहे. त्यामुळे संबंधित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहणे अत्यंत आवश्यक असल्याचेही दिपक गवस यांनी स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा