You are currently viewing सपना गायकवाड यांना आविष्कार फाउंडेशनचा क्रांतीज्योती राज्य गुणवंत शिक्षिका पुरस्कार

सपना गायकवाड यांना आविष्कार फाउंडेशनचा क्रांतीज्योती राज्य गुणवंत शिक्षिका पुरस्कार

*सपना गायकवाड यांना आविष्कार फाउंडेशनचा क्रांतीज्योती राज्य गुणवंत शिक्षिका पुरस्कार*

*बांदा*

शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या भरीव व सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत विलवडे येथील प्राथमिक शिक्षिका सपना संदिपान गायकवाड यांना आविष्कार फाउंडेशनतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा क्रांतीज्योती राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार सातारा येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

सपना गायकवाड यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडविण्याच्या उद्देशाने कार्य केले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी त्यांनी राबविलेले उपक्रम, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी घेतलेली मेहनत, तसेच पालक व समाजामध्ये शिक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी केलेले प्रयत्न विशेष उल्लेखनीय आहेत.

त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेत आविष्कार फाउंडेशनने त्यांची ‘क्रांतीज्योती पुरस्कार’साठी निवड केली. या सोहळ्यास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपत्र ,प्रशस्तिपत्र व शाल‌ देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाला शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षकवर्ग तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुरस्कार स्वीकारताना सपना गायकवाड यांनी हा सन्मान आपल्यासाठी गौरवास्पद व प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली.

सपना गायकवाड यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल विलवडे सरपंच प्रकाश दळवी तसेच शाळेचे मुख्याध्यापक सहकारी शिक्षक ,पालक,ग्रामस्थ व मित्र परिवार यांचेकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा