वैभववाडी बाजारपेठ पुढील चार दिवस राहणार बंद…

वैभववाडी बाजारपेठ पुढील चार दिवस राहणार बंद…

गर्दी टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी घेतला एकमुखी निर्णय…

वैभववाडी

शहराबरोबरच ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर वैभववाडी बाजारपेठेत होणारी गर्दी टाळण्यासाठी येथील व्यापारी मंडळांने दि. २७ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच प्रशासनाला सहकार्य करण्याच्या उद्देशाने चार दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सद्यस्थिती शासनाने अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी ७ ते ११ वा. या वेळेत उघडण्याची मुभा दिली आहे. परंतु ग्राहकांची या सकाळच्या सत्रात खूपच गर्दी होताना दिसते. ही गर्दी टाळण्यासाठी व कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी दुकाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ मेडिकल सेवा सुरू राहणार आहे. अशी माहिती व्यापारी मंडळाचे अध्यक्ष रत्नाकर कदम यांनी दिली आहे. यावेळी माजी अध्यक्ष मनोज सावंत, पदाधिकारी अरविंद गाड, तेजस आंबेकर, सुरेंद्र नारकर व व्यापारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा