You are currently viewing सावंतवाडी शहराचा सर्वांगीण विकास व पारदर्शक कारभारावर भर – उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर

सावंतवाडी शहराचा सर्वांगीण विकास व पारदर्शक कारभारावर भर – उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर

सावंतवाडी शहराचा सर्वांगीण विकास व पारदर्शक कारभारावर भर – उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर

सावंतवाडी

सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असून विकासाच्या माध्यमातून पक्ष संघटनाही अधिक मजबूत करण्याचा निर्धार नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी व्यक्त केला. सामान्य कार्यकर्त्यालाही जबाबदारी देणारी भारतीय जनता पार्टी ही सर्वसमावेशक विचारांची पक्षसंस्था असून, मला दिलेल्या संधीचे सोने करीत पारदर्शक व गतिमान कामकाज करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह भाजपचे युवा नेते विनोद राऊळ, माजी नगरसेवक विलास जाधव, नगरसेवक व प्रभाग क्रमांक १० मधील मतदारांचे विशेष आभार मानले.

जात, पात किंवा धर्म न पाहता सामान्य कार्यकर्त्याला संधी देणारी भारतीय जनता पार्टी असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित करत, उपनगराध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल त्यांनी पक्षाचे आभार व्यक्त केले.

नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी नगरपालिकेचा कारभार पूर्णतः पारदर्शक पद्धतीने चालवला जाईल. नागरिकांच्या कामांमध्ये कोणतीही दिरंगाई होणार नाही. सर्व नियमांचे काटेकोर पालन करूनच कामकाज होईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

सध्या शहरात सुरू असलेली पाईपलाईनची कामे नियमानुसार व योग्य पद्धतीनेच केली जातील, यासाठी ठेकेदारांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. नियमबाह्य कामे सुरू असल्यास ती तात्काळ थांबवली जातील. ज्या ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत तेथे काम पूर्ण झाल्यानंतर डांबरीकरण करण्यात येईल. तसेच धूळ प्रदूषण टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

नगरपालिकेत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नसून सर्वांना सोबत घेऊन विकासात्मक कामांना प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. कचरा डेपोवर काही प्रमाणात मनुष्यबळ कमी असले तरी कामकाज सुरू असून पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे. येत्या महिन्याभरात मुख्याधिकारी नियुक्त होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, नवनिर्वाचित नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांच्यासह भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा