You are currently viewing एस्कॉप पुणे तर्फे पार पडल्या ज्येष्ठांच्या वकृत्व स्पर्धा

एस्कॉप पुणे तर्फे पार पडल्या ज्येष्ठांच्या वकृत्व स्पर्धा

*एस्कॉप पुणे तर्फे पार पडल्या ज्येष्ठांच्या वकृत्व स्पर्धा*

 

पुणे:

मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघटना पुणे, (ऍस्कॉप) च्या वतीने, शनिवार दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता धर्मवीर संभाजी शाळेतील सभागृहात, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी संस्थेने चार विषय दिले होते. ही स्पर्धा लोकमान्य ज्येष्ठ नागरिक संघाने प्रायोजित केली होती.

या स्पर्धेसाठी ३५ सभासदांनी नावे नोंदविली होती. सर्वानी विषयाला अनुसरून उदाहरणासह उत्तम सादरीकरण केले.

सदर स्पर्धेसाठी या विषयातील नामांकित परिक्षक महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणेचे अध्यक्ष आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बहि:शाल व्याख्याते मा. वि. ग. सातपुते, श्री. विनय फाटक व सुरेखा पेंडसे. लाभले होते.

संस्थेचे उपाध्यक्ष बंडोपंत फडके यांनी मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ऍस्कॉप संस्थेचे पदाधिकारी, स्पर्धा प्रमुख वसंत दापोळकर, सचिव उर्मिला शेजवलकर, श्रध्दा चिटणीस, अच्युत कुलकर्णी, व उदय रेणुकर तसेच लोकमान्य ज्येष्ठ नागरिक संघातील पदाधिकारी शोभना बहिरट, दशरथ बहिरट, रामभाऊ कुलकर्णी व स्मिता ब्रह्मे यांनी मोलाचे सहकार्य केले.

शेवटी परिक्षक व ज्येष्ठ साहित्यिक वि. ग. सातपुते ( आप्पा ) यांनी सर्व सहभागी सभासदाचे कौतुक करुन या विषयी आपले विचार मांडले.

या स्पर्धेत खास करून महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणेचे उपाध्यक्ष डॉ महेंद्र ठाकुरदास उपस्थित होते. त्यांनीही सर्वांचे कौतुक केले व याविषयी आपले विचार मांडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा