You are currently viewing चंदामामा

चंदामामा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*चंदामामा…*

 

रोज माझ्या खिडकीत येतो माझा चंदामामा

खुद् कन गालात हसतो माझा चंदामामा..

अंगणात मी येता तोही सोबत येतो

मी धावू लागताच तो माझ्यासेबत धावतो…

 

गोल गोल वाटोळा कित्ती छान दिसतो

केव्हाही पहा तो प्रसन्नच असतो

दूध सांडतो जणू तो ओतत असतो घागरी

अमृताचा वर्षाव करत बघत असते स्वारी…

 

मी अंथरूणावर पडताच तो एकाजागी थांबतो

मी बघते त्याच्याकडे तो ही बघत बसतो

बघता बघता डोळे माझे अलगद कधी मिटतात

झोपेतसुद्धा चंदामामा माझ्यासोबत असतात..

 

लिंबोणीच्या झाडामागे तो जाऊन झोपतो

रात्रभर काम करून दिवसा आराम करतो

मी म्हणते लिंबोणीच्या झाडात लपलास का

दूध पोळी खाऊन जा, मामा थकलास का?

 

रात्र होताच पुन्हा मग दिमाखात येतो

खिडकीत येताच माझ्या तो आम्ही खूप हसतो

असे आहे गुपित आमचे दोघांचे हो छान

चमचम करते सारे विश्व आणि सारे रान…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा