You are currently viewing दिविजा वृद्धाश्रमात आजी आजोबांनी साजरा केला मकर संक्रांतीचा कार्यक्रम

दिविजा वृद्धाश्रमात आजी आजोबांनी साजरा केला मकर संक्रांतीचा कार्यक्रम

दिविजा वृद्धाश्रमात आजी आजोबांनी साजरा केला मकर संक्रांतीचा कार्यक्रम

कणकवली

आजी आजोबांचे मानसिक आरोग्य नीट राहावे या उद्देशाने दिविजा वृद्धाश्रमात प्रत्येक भारतीय सन उत्साहाने साजरा केला जातो. माघ महिन्यात येणारा मकर संक्रांतीचा सन हळदी कुंकवाचा समारंभ करून दिविजा वृद्धाश्रमातील आजींनी आनंदपूर्ण वातावरणात साजरा केला. आजींनी पारंपारिक पद्धतीने सुगड पूजन केले व हळदी कुंकू कार्यक्रमाची सुरुवात केली आजींना वाण म्हणून फनी देण्यात आली.हिवाळ्यातील थंडी शरीराला उष्णता मिळवण्यासाठी गुळ व तीळ यांचा आहारात समावेश केला जावा या उद्देशाने तिळाचे लाडू खाण्यासाठी केला जातात. या लाडूंचा आस्वाद सर्वाना घेता यावा यासाठी घरा घरात हळदी कुंकू घातले जाते व तिळगुळ दिला जातो. आजी आजोबांची ही परंपरा अजूनही जपली आहे. आपल्या पुढच्या पिढीला ही गोष्ट कळावी म्हणून आश्रमातील आजी आजोबांनी एकमेकांना तीळगुळ व लाडू देऊन हा सन साजरा केला. आश्रमातील कर्मचार्यांनी काळ्या साड्या नेसून तिळाचे दागिने परिधान करून आजी आजोबांच्या आनंदात आणखी भर घातली. अशा प्रकारे दिविजा वृद्धाश्रमात मकर संक्रांतीचा सन साजरा करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा