You are currently viewing वेंगुर्ला आगारात सुरक्षितता अभियानांतर्गत मोफत नेत्र तपासणी व दंत चिकित्सा शिबिर

वेंगुर्ला आगारात सुरक्षितता अभियानांतर्गत मोफत नेत्र तपासणी व दंत चिकित्सा शिबिर

*वेंगुर्ला आगारात सुरक्षितता अभियानांतर्गत मोफत नेत्र तपासणी व दंत चिकित्सा शिबिर*

*सेवा शक्ती संघर्ष एस्.टी. कर्मचारी संघ आयोजित नेत्र व दंत चिकीत्सा शिबीरास कर्मचारी तसेच प्रवासी वर्गाचा उस्फूर्त प्रतिसाद.*

वेंगुर्ला :

भाजपा प्रणित सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघ यांच्या माध्यमातून वेंगुर्ले आगारात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुरक्षितता अभियानांतर्गत मोफत नेत्र तपासणी व दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी गद्रे नेत्र रुग्णालयाचे नेत्र चिकित्सक उदय दाभोलकर , तसेच एकदंत डेंटल क्लिनिक च्या दंत चिकित्सक डाॅ. तन्वी गोडकर व त्यांच्या टीमने तपासणी केली .
या शिबिराला आगारातील अधिकारी, कर्मचारी तसेच पदाधिकाऱ्यांचा तसेच प्रवासी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिराचे उद्घाटन व दीपप्रज्वलन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तसेच सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाचे आगार अध्यक्ष श्री. प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री. अशोकजी राणे, वेंगुर्ला आगार व्यवस्थापक श्री. नवज्योत गावडे, वाहतूक निरीक्षक श्री. तेजस तारी, भाजपा नेते श्री. दादा केळुस्कर , ओबीसी सेलचे शरद मेस्त्री उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. प्रसन्ना देसाई म्हणाले की, एस.टी. कर्मचारी हे दररोज हजारो प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य सुदृढ असणे अत्यंत आवश्यक आहे. सुरक्षितता अभियानाच्या माध्यमातून कर्मचारी वर्गाच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा आमचा प्रयत्न असून नेत्र व दंत तपासणीसारख्या उपक्रमांमुळे आजारांचे वेळीच निदान होऊन अपघात टाळण्यास मदत होते. भविष्यातही सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वतीने असे उपयुक्त उपक्रम सातत्याने राबविले जातील, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी वेंगुर्ले आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन जास्तीत जास्त एस्.टी कर्मच्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा , असे आवाहन केले .
यावेळी सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाचे विभागीय सचिव श्री. भरत चव्हाण, विभागीय पदाधिकारी श्री. संजय सावंत, श्री. प्रशांत गावडे, आगार सचिव श्री. दाजी तळवणेकर, श्री. महादेव भगत, श्री. स्वप्नील रजपूत, श्री. चंद्रकांत रजपूत, श्री. सखाराम सावळ, श्री. निखिल भाटकर, श्री. मिलिंद मयेकर, श्री. सुनील सावंत, श्री. तेजस सावंत, श्री. प्रवीण रेवंडकर यांच्यासह मोठ्या संख्येने वेंगुर्ला आगारातील कर्मचारी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये डॉ. गद्रे नेत्र रुग्णालय, वेंगुर्ला तसेच एकदंत डेंटल क्लिनिक यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून कर्मचाऱ्यांची तसेच प्रवाशांची मोफत नेत्र तपासणी, दंत तपासणी तसेच आवश्यक वैद्यकीय सल्ला देण्यात आला. सुरक्षित प्रवासासाठी चालक व वाहकांचे आरोग्य अत्यंत महत्त्वाचे असून अशा उपक्रमांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा