कार्यकर्त्यांचा आग्रह, निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत
कुडाळ :
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर इच्छुक उमेदवारांची लगबग वाढली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद मतदारसंघात गत जिल्हा परिषद सदस्यांना आरक्षणानुसार पुन्हा संधी मिळणार आहे.
दरम्यान कुडाळ तालुक्यातील शहरानजीकच्या पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अमरसेन सावंत यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यांच्या विरोधात भाजपा व शिवसेना शिंदे गट यांच्याकडून कोण उमेदवार असेल हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
अमरसेन सावंत यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले कार्यकर्त्यांचा मोठा आग्रह आहे त्यामुळे जनतेच्या आग्रहाखातर उबाठामधून आपण पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.
