राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद
मुंबई : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज राज्य निवडणूक आयोगाकडून महत्त्वपूर्ण माहिती जाहीर केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्या वतीने राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे मंगळवार, दि. १३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.
ही पत्रकार परिषद सह्याद्री अतिथिगृह, मलबार हिल, मुंबई येथे आयोजित करण्यात आली असून, यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या कार्यक्रम, नियमावली तसेच निवडणूक प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले जाण्याची शक्यता आहे.
राज्यभरातील पत्रकार, संपादक व माध्यम प्रतिनिधींनी या पत्रकार परिषदेला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. उपस्थित राहणे शक्य नसल्यास आपल्या प्रतिनिधीला पाठवण्याची विनंतीही आयोगाकडून करण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत स्पष्ट दिशा मिळणार असल्याने ही पत्रकार परिषद निवडणूक प्रक्रियेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, सर्वांचे लक्ष आजच्या घोषणांकडे लागले आहे.
