You are currently viewing भाजप आणि शिंदेंच्या ताब्यात मुंबई गेल्यास महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी होण्यास वेळ लागणार नाही-वैभव नाईक

भाजप आणि शिंदेंच्या ताब्यात मुंबई गेल्यास महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी होण्यास वेळ लागणार नाही-वैभव नाईक

*भाजप आणि शिंदेंच्या ताब्यात मुंबई गेल्यास महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी होण्यास वेळ लागणार नाही-वैभव नाईक*

*मुंबईत माजी आमदार वैभव नाईक यांचा प्रचाराचा धडाका*

*प्रचारसभा,कॉर्नर सभा,मशाल रॅली,प्रचार कार्यालयांना भेटी आणि डोअर टू डोअर प्रचारात सहभाग*

५० खोक्यांसाठी आमदार, खासदार यांनी उद्धवजी ठाकरेंसोबत गद्दारी केली. या गद्दारीवर ५० खोके एकदम ओके हि घोषणा देण्यात येत आहे.आज तीच घोषणा भाजपचे पदाधिकारी देत असून ५० खोक्यांसाठी झालेल्या गद्दारीवर भाजपनेही शिक्कामोर्तब केले आहे. भाजप-शिंदे सरकारकडून मुंबई महापालिकेतही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. शिवसेनेने २५ वर्षांच्या सत्ता काळात तब्बल ९२ हजार कोटी रुपयांच्या ठेवलेल्या ठेवी भाजप-शिंदे सरकारने मोडल्या आहेत. अदानीला विकण्यासाठी त्यांना मुंबई हवी आहे. उद्या आपली मुंबई भाजप आणि शिंदेच्या ताब्यात गेल्यास महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी होण्यास वेळ लागणार नाही. आणि यांचे संकेत तामिळनाडूचे भाजपाचे स्टार प्रचारक के. अण्णामलाई यांनी मुंबईत येऊन “मुंबई ही महाराष्ट्राची नाही” असे वक्तव्य करून दिले आहेत.यामाध्यमातून भाजपच्या जे पोटात आहे ते ओठात आले. निवडणुकीच्या माध्यमातून मुंबई वाचविण्याची शेवटची संधी प्रत्येक मुंबई वासीयांच्या हातात आहे. या संधीचे सोने करून भाजप आणि शिंदेंना या निवडणूकितुन हद्दपार करा. सत्ताधाऱ्यांच्या कुठल्याही अमिषाला बळी पडू नका असे आवाहन माजी आमदार वैभव नाईक यांनी केले.

माजी आमदार वैभव नाईक यांनी शनिवारी व रविवारी मुंबईत प्रचाराचा धडाका लावत मुंबई महापालिका निवडणुकीच्या विविध प्रभागातील शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांच्या जाहीर प्रचारसभा, कॉर्नर सभांना संबोधित केले.मशाल रॅलीत सहभागी झाले तसेच प्रचार कार्यालयांना भेट देऊन आढावा घेतला, डोअर टू डोअर प्रचारातही वैभव नाईक सहभागी झाले.
त्यामध्ये वैभव नाईक यांनी प्रभाग क्र.११४ च्या उमेदवार राजुल संजय पाटील यांच्या प्रचार कार्यालयास भेट देऊन त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी खासदार संजय दिना पाटील, माजी आमदार रमेश कोरगावकर उपस्थित होते. प्रभाग क्र. १२० चे उमेदवार विश्वास तुकाराम शिंदे यांच्या प्रचारानिमित्त काढलेल्या मशाल रॅलीत वैभव नाईक सहभागी झाले. यावेळी आमदार सुनील राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रभाग क्र.११७ च्या उमेदवार श्वेता राजेश पावसकर यांच्या प्रचारानिमित्त आयोजित कॉर्नर सभेला वैभव नाईक यांनी उपस्थिती दर्शवत मार्गदर्शन केले. प्रभाग क्र.११९ चे मनसे पक्षाचे उमेदवार विश्वजित शंकर ढोलम यांच्या प्रचारासाठी खासदार संजय दिना पाटील, आमदार सुनील राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती या प्रचार सभेला माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून संबोधित केले. प्रभाग क्र. १३१ च्या उमेदवार वृषाली विशाल चावक यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत वैभव नाईक यांनी मार्गदर्शन केले. प्रभाग क्र. १२८ च्या मनसे पक्षाच्या उमेदवार सई सनी शिर्के यांच्या प्रचार कार्यालयास भेट देत विजयासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी वैभव नाईक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रभाग क्र. ८० च्या उमेदवार एकता विनोद चौधरी, प्रभाग क्र.८७ च्या उमेदवार पूजा विश्वनाथ म्हाडेश्वर व प्रभाग क्र. ७७ च्या उमेदवार शिवानी शैलेश परब यांच्या डोअर टू डोअर प्रचारात वैभव नाईक सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा