कुडाळ :
तालुक्यातील माणगाव तिठा येथे डॉ. आकांक्षा डेंटल क्लिनिकचे शनिवारी (दि. १०) शानदार उद्घाटन झाले. यावेळी माणगाव तसेच परिसरातील मान्यवर उपस्थित होते.
कुडाळ येथील डॉ. सिद्धेश दत्तात्रय बांदेकर (बी.डी.एस. एम.डी.एस. रूट कॅनल स्पेशालिस्ट) यांच्या हस्ते फीत कापून माणगाव तिठा (गणेश मेडिकलच्या शेजारी) येथील डॉ. आकांक्षा डेंटल क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले. माणगाव येथे डेंटल क्लिनिक नसल्याने माणगाव खोऱ्यातील नागरिकांना सावंतवाडी किंवा कुडाळला जावे लागत होते. डॉ. आकांक्षा यांनी हे क्लिनिक सुरू केल्याने माणगाव खोऱ्यातील व परिसरातील नागरिकांची येथे चांगली सोय होणार असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.
यावेळी सूर्यकांत बिबवणेकर, राजन सावंत, अजित कदम, मनोज शेडगे, अशोक धुरी, दिगंबर सावंत, दिलीप माळकर, संतोष जाधव, सुनील जाधव, संतोष सावंत, पंढरीनाथ कदम, बुधाजी कांबळी, रवींद्र जाधव, डॉ. साळगावकर, सौ. साळगावकर आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. सिद्धेश बांदेकर, जागा मालक राजन सावंत, मनोज शेडगे यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. आकांक्षा यांनी यावेळी सर्व उपस्थितांचे आभार मानले. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे निवृत्त व्यवस्थापक अनिल वसंत जाधव तसेच प्राथमिक शिक्षिका स्नेहांकिता अनिल जाधव यांच्या डॉ. आकांक्षा या द्वितीय कन्या आहेत. त्या डेंटल सर्जन आहेत. डॉ. आकांक्षा क्लिनिक सकाळी १० ते दु. १ व सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत सुरू असणार आहे. याचा माणगाव खोरे व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी अनेक मान्यवरांनी डॉ. आकांक्षा यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
