“पंचम खेमराज महाविद्यालय आयोजित लोककला महोत्सवाची सांगता”….
सावंतवाडी
संस्थान काळापासून लोककलेला नेहमीच प्रोत्साहन दिलेले आहे.गेल्या चार वर्षांपासून सातत्याने राजवाड्याच्या भव्य पटांगणात आणि सावंतवाडीचे वैभव असलेल्या मोतीतलावाच्या काठावर या महोत्सवाचे आयोजन केले जाते.
यावर्षी सुद्धा हा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.आजच्या समारोपाच्या कार्यक्रमात दिड हजाराहून जास्त उपस्थिती होती.संस्थानच्पा १९ व्या जनरेशनचे नेतृत्व करणारे युवराज लखमराजे यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव सुरू झाला असून लोककलेला राजाश्रय देण्याचा संस्थानचा वारसा लखमराजे यानी पुढे सुरू ठेवला हे खरोखरच कौतुकास्पद आहे.हा महोत्सव दिवसेंदिवस लोकाभिमुख होत असून लोकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.लखमराजे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भारमल सर,त्यांचे सर्व सहकारी,संचालक मंडळाचे पदाधिकारी अँड शामराव सावंत,श्री जयप्रकाश सावंत आदींनी हा लोककला महोत्सव यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.सांस्कृतिक चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणून या सोहळ्यात मला सहभागी होता आले याचा मनस्वी आनंद आहे.
