You are currently viewing जिल्हा नगरोत्थान योजनेंतर्गत देवगड–जामसंडेत २६ विकासकामांचे भूमिपूजन

जिल्हा नगरोत्थान योजनेंतर्गत देवगड–जामसंडेत २६ विकासकामांचे भूमिपूजन

जिल्हा नगरोत्थान योजनेंतर्गत देवगड–जामसंडेत २६ विकासकामांचे भूमिपूजन

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सहकार्यामुळे शहर विकासाला गती

देवगड–जामसंडे शहरात जिल्हा नगरोत्थान योजना २०२५–२०२६ अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीच्या वतीने शनिवार, दिनांक १० जानेवारी रोजी करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नामदार नितेश राणे यांच्या सहकार्यामुळे ही महत्त्वपूर्ण विकासकामे मंजूर झाली असून त्यामुळे शहराच्या पायाभूत सुविधांना भक्कम बळ मिळणार आहे.
या भूमिपूजन कार्यक्रमाला माजी आमदार अजित गोगटे, बाळ खडपे, मंडल अध्यक्ष राजा भूजबळ, उपाध्यक्षा प्रियांका साळसकर, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, सरचिटणीस योगेश चांदोस्कर, महेश जंगले, कोषाध्यक्ष राजेंद्र वालकर, उल्हास मणचेकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष दया पाटील, महिला मोर्चा अध्यक्षा उषःकला केळुस्कर, नगरसेवक गटनेते शरद ठुकरुल, बांधकाम सभापती रोहन खेडेकर, नगरसेवक संतोष तारी, चंद्रकांत कावले, नगरसेविका प्रणाली माने, पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर, नगरसेविका रुचाली पाटकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विकासकामांमुळे देवगड–जामसंडे शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, गटारे, संरक्षक भिंती, पायवाटा, गार्डन व ओपन स्टेज यांसारख्या मूलभूत सुविधांचा विकास होणार असून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.
प्रभागनिहाय मंजूर करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये देवगड–निपाणी मुख्य रस्ता ते माधव भंडारी यांच्या घरापर्यंत डांबरीकरण, प्रभाग क्रमांक ३ मध्ये पिण्याच्या पाण्याची लाईन टाकणे, चिरेबंदी पायवाट बांधणे, विविध ठिकाणी संरक्षक भिंती उभारणे, गटारांवर स्लॅब, बंदिस्त गटारे व पायवाटांचे काँक्रिटीकरण, लघुनळ योजनेचे चबुतरे व पाईपलाईन बदल, अंतर्गत वसाहतीतील रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण, विहीर खोदणे व बांधकाम, पाणंद रस्ते, नवीन रस्ते, गार्डन निर्मिती, कंपाउंड व ओपन स्टेज उभारणी आदी कामांचा समावेश आहे. एकूण २६ विकासकामे या योजनेअंतर्गत मार्गी लागली आहेत.
भाजपच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक प्रभागात समतोल व सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न सुरू असून, आगामी काळातही अधिकाधिक विकासकामे मंजूर करून शहराच्या विकासाला सातत्याने गती दिली जाईल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा