*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माझ्या… प्रेमाचा कॅरम ..!!*
तुला हळुवार स्पर्श
करत नाजूक कट ..मारला
तुला न दुखवता
घणाघाती.. रिबांऊड मारला ..!
इतुके प्रेमाने ओढून घेतले
राणी..तू तरीही रूसुन बसली
अगं..जीव ओवाळून टाकला
तरी तू सोंगट्यात जावून घुसली ..!
चडफड,चुटपुट,चुकचुक
इशारे… तुला देत राहिलो
तुझ्या मोहक हालचाली बघून
प्रेमाचा डाव घालवून बसलो ..!
खोल जखम झाली..गं..
जेव्हा तू पाॅकेटात जावून बसली
आशिक पगला मी ..वेडा तुझा
समोरच्या प्रियकराची मानगूट धरली
आयुष्याचा माझ्या तू कॅरम केलास
पदोपदी माझा अपमान झाला
राणी…प्रेम मनापासून केलं गं!
प्रयत्न तरीही मी नाही सोडला ..!
आनंदाचा तो क्षण आला
तु कुशीत आलीस!नकार दिला नाही
कमनशिबी..दुर्देवी किती गं.. मी
कव्हर.. मला घेता आला नाही!
सत्य कायम टोकदार असतं
खेळाला या.. पाॅईंट असतो
कॅरमच्या या… प्रेमखेळांत
राणीला कधीच राजा नसतो..!
राणीला या खेळात… राजा कधीच नसतो …!!
बाबा ठाकूर ठाकूरी उवाच
कॅरम..रिबांऊड..सादरीकरणाची
