You are currently viewing सुप्रभात
Oplus_16908288

सुप्रभात

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा आदर्श शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

🌄सुप्रभात🌄

 

मालवून चांदण्याचे दिवे

रात सरुन गेली

त्या चांदण्याची शाल पांघरुन

रातराणी फुलली

रातभर रुसलेली प्राची गाल

फुगवून हसली

नारिंगी, गुलाबी छटांनी उषा

प्रफुल्लित झाली!

 

 

उगवत्या सूर्य नारायणाच्या

सोनसळ्यांची कमाल

मेघांच्या पाठीवरून त्यांची

चाले धमाल

पाठशिवणीच्या खेळामध्ये

लागे स्पर्धा बेमिसाल

सुवर्ण किरणांचे पसरतसे

धरेवरी मायाजाल.

 

मधुर कोकिळातान सुरेल

किलबिलाट तरुंवरी

रानावनी,जाग येई पांखरांना

ढोलीत फिरती खारी,

रानफुलांचा गंध वाहे मरुत

सकाळची देत ललकारी

उठा, प्रभुराया घंटानाद,शंख

वाजे मंदिरी, नदीतीरी.

🛕🛕🛕🛕🛕🛕🛕

 

स्वप्नगंधा सतीश आंबेतकर

कला शिक्षिका

प्रतिक्रिया व्यक्त करा