*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*निष्ठुर शब्द*
〰️〰️〰️〰️
सलोखी शब्द जेंव्हा निष्ठूर होतात
तेंव्हा संयमाचा तोल गेलासे वाटते
तोलूनी , मापूनी विवेके व्यक्त होणे
हे संस्कारांचे प्रांजळ वास्तव असते
आता शब्द , भाव , प्रीत जिव्हाळा
हेच केवळ बेगडी तोंडदेखले वाटते
गैरसमजाचे मळभच जगी संशयाचे
वेदनांचे कोसळणारे आभाळ असते
आपणच केवळ मौनात मुसमुसतो
सांगा नि:शब्दांना व्यक्त कसे करावे
जे शब्दच जेंव्हा निष्ठुर जाणवतात
तेंव्हा संयमाचा तोल गेलासे वाटते
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*विगसा*
