उत्तर भारतीय मजुरांमध्ये हत्तीरोगाचा संशय
जिल्ह्यात प्रतिबंधक उपाययोजना
सिंधुदुर्गनगरी,
उत्तर भातीय मजूरांमध्ये हत्तीरोग जंतू (मायक्रोफायलेरीया) आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर 4 डिसेंबर 2025 रोजी मालवण तालुक्यातील मसुरे येथील मजुरांचे सर्व्हेक्षण करण्यात येवून हिवतापाचे जंतू आहेत का हे पहाण्यासाठी रक्त नमुने घेण्यात आले होते. तपासणीत काही मजुरांच्या रक्तनमुन्यामध्ये हत्तीरोगाचे जंतू (मायक्रोफायलेरीया) आढळून आले असून, संबंधित मजुरांमध्ये अद्याप कोणतीही लक्षणे दिसून आलेली नाहीत. अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली आहे.
त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मजूर सर्वेक्षण करण्यात आले असून डिसेंबर 2025 पासून आज अखेरपर्यंत उत्तर भारतीय मजुरांचे एकूण रात्रीच्या रक्त नमुने संकलन 1 हजार 479 करण्यात येवून तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 30 मजुरांमध्ये हत्तीरोगाचे जंतू (मायक्रोफायलेरीया दूषित लक्षणे विरहीत रुग्ण आढळून आले. यामध्ये उत्तरप्रदेश मधील 24 रुग्ण ,बिहारमधील 5 रग्ण व मध्यप्रदेश मधील 1 रुग्ण आहेत.
त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यमध्ये 4 डिसेंबर 2025 खालील प्रमाणे प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
सर्व दुषित आढळून आलेले रुग्ण हे उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल इत्यादी उत्तर भारतीय राज्यातून मजूरीमाठी आलेले मजूर होते. आपल्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील सर्व मजूर वस्तीवरील मजुरांचे आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत रात्रीचे फिरुन हत्तीरोगासाठी रक्तनमुने गोळा करण्यात आले. वरील प्रमाणे मजूरामध्ये हत्तीरोग जंतू दुषित रुग्ण आढळून आले पण त्यांच्यामध्ये हत्तीरोगाची कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत.
सर्व हत्तीरोगाचे जंतू (मायक्रोफायलेरीया) दुषित आढळून आलेल्या मजूर रुग्णांना समुळ उपचार करण्यात आलेला असून त्यांचे सहवासीतामध्ये एकदिवशीय प्रतिबंधात्मक उपचार देण्यात आलेला आहे. या कार्यालयाकडील किटकसमाहारक यांच्यामार्फत हत्तीरोगाचे जंतू (मायक्रोफायलेरीया) आढळलेल्या रुग्ण भागामध्ये डास गोळा करण्यात येवून डासामधील हत्तीरोग जंतूचा शोध घेण्यात आला. तसेच या भागामध्ये डास अळी पैदास होणार नाही, यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना, जनजागृती करण्यात आली.
सह.संचालक आरोग्य सेवा (हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग) पुणे या कार्यालयाकडील राज्यस्तरीय पथक व कनिष्ठ किटकशास्त्रज्ञ डॉ. सोमाजी अनुसे यांच्यामार्फत 6 जानेवारी 2026 पासून जिल्हयामध्ये हत्तीरोगाचे जंतू (मायक्रोफायलेरीया) दुषित आढळून आलेल्या मजूर भागामध्ये पहाणी करण्यात आले असून मार्गदर्शन करण्यात आले आहे. तसेच डॉ. संजय रणवीर सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप) कोल्हापूर व पथक यांच्यामार्फत पहाणी करण्यात येत असून सदर पथक सद्या मालवण तालूक्यातील दुषित आढळलेल्या भागात पर्यवेक्षकीय पहाणी व मार्गदर्शन करण्यात येत आहे.
सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील सर्व प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, गट-क यांना एकदीवशीय हत्तीरोग जंतू दुषित रक्तनमुना तपासणीबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच दि.7 ते 8 जानवारी 2026 रोजी जिल्ह्यातील सर्व आरोग्य पर्यवेक्षक व आरोग्य निरीक्षक (सहाय्यक) यांची कार्यशाळा आयोजीत करण्यात येवून त्यामध्ये पर्यवेक्षकीय सर्वेक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. संबंधित ग्रामपंचायतींना आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत डासोत्पत्तीस्थानामध्ये प्रतिबंधक उपयोजना करण्याबात कळविण्यात आले आहे.
