सावंतवाडी व्यापारी संघाकडून नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांचे अभिनंदन
सावंतवाडी
सावंतवाडी तालुका व्यापारी, उद्योजक व व्यवसायिक संघातर्फे सावंतवाडी नगरपरिषदेच्या नूतन नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले यांची आज दुपारी सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष, पदाधिकारी व सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या भेटीदरम्यान व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री. जगदीश मांजरेकर यांनी सावंतवाडी शहरातील व्यापारी बांधवांना भेडसावणाऱ्या पार्किंग व इतर समस्यांबाबत नगराध्यक्षांशी चर्चा केली. या समस्यांच्या निराकरणासाठी लवकरच सविस्तर भेट घेऊन चर्चा करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.
या प्रसंगी व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री. जगदीश मांजरेकर, माजी सेक्रेटरी श्री. बाळासाहेब बोर्डेकर, संघाचे उपाध्यक्ष व नगरसेवक श्री. आनंद नेवगी, उपाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी अध्यक्ष श्री. हेमंत मुज, सेक्रेटरी श्री. किरण सिद्दये, सदस्य श्री. संदेश परब, सदस्य श्री. दत्ताराम सावंत, नगरसेवक श्री. सुधीर आडीवरेकर व नगरसेवक प्रतीक बांदेकर उपस्थित होते.
