You are currently viewing अशीच नेहमी संध्याकाळी

अशीच नेहमी संध्याकाळी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अशीच नेहमी संध्याकाळी*

(745)

 

अशीच नेहमी संध्याकाळी

शीट्टी मारून भेटायचो रोज

घट्ट बिलगून खूप बोलायची

मलाही वाटायची खूप मौज…..1

अल्लड होती तशी बडबडी

मोकळी असायची बोलताना

नव्हते “दडले” मनात काही

वावही नव्हता लघु शंकाना……2

*संध्या* असून नाव तिचे

होती कांती गव्हाळ वर्णाची

कुशीत शिरता हरखून जायची

आळशी नसून उशीरा यायची….3

होते अंतर *फार* वयात

एके दिवशी सांगून टाकले

व्हायचे होते तेच *घडले*

तिच्या पुढे मी हात टेकले……. 4

नव्हते मंजूर परमेश्वराला

येऊन दारात वडील थडकले

साश्रू नयनांनी सोडून गेले

*घडू नये ते होते घडले*………5

 

स्वलिखीत रचना

विनायक जोशी 🖋️ठाणे

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा