अहिल्यानगर येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान; गावकऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव
सावंतवाडी :
सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कारासाठी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांची निवड करण्यात आली आहे. आज अहिल्यानगर येथे आयोजित भव्य समारंभात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले भरीव कार्य, प्रशासनातील पारदर्शकता, नागरिकांशी साधलेला सकारात्मक संवाद तसेच विविध विकासकामांमध्ये घेतलेला सक्रिय सहभाग याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
या सन्मानाबद्दल सर्व स्तरांतून गुणाजी गावडे यांचे अभिनंदन करण्यात येत असून, गावातही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ग्रामस्थांनी त्यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
