You are currently viewing पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाचे भूमिपूजन
Oplus_16908288

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाचे भूमिपूजन

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाचे भूमिपूजन

सिंधुदुर्गनगरी 

 पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयीन इमारतीच्या कामाचा भूमिपूजन समारंभ रविवार ४ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. या समारभ प्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार नारायण राणे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

या कार्यक्रमास सर्वश्री आमदार अॅड. निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, दीपक केसरकर, निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, कोकण प्रादेशिक विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हा कार्यक्रम सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय येथे संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी समीर घारे, अधिक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता पूजा इंगवले, सहाय्यक अभियंता अजित पाटील यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा