हडपसर पुणे –
कोणाचाही द्वेष मत्सर न करता विश्व हेच माझे घर या ब्रीदवाक्याने प्रेरित झालेले हे स्वानंद we can याची प्रचिती आणून देते – प्रा सुरेखा कटारिया संस्थापक अध्यक्ष यांनी आपले विचार व्यक्त केले.
2025 /26 या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पुढील वर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून 25 वर्षाचा लेखाजोखा आपल्यासमोर आपल्या समवेत ठेवत स्वानंदच्या अध्यक्षा शोभा बंब यांनी आपल्या मनीचे भाव व्यक्त केले.
सर्व महिलांना प्रेरित करत मेहर रिसॉर्ट्स मध्ये कार्यक्रम उत्साहात पार पडला. या पंचवीस वर्षाच्या कालावधीत
स्वांनदच्या अध्यक्षपदी आत्तापर्यंत संस्थापिका प्रा सुरेखा कटारिया यांनी सुरुवातीला अध्यक्ष पदाचे काम केले.
स्वानंद संस्थेचा इतर कार्यकर्तृत्व मान्यवर स्वानंद सख्यांकडे कार्यभार सोपविला. प्रथम संस्थापिका अध्यक्षा प्रा. सुरेखा कटारिया यांनी कार्यभार सांभाळला व त्यानंतर अनुक्रमे स्वानंद चे अध्यक्षपदाची धुरा खालील स्वानंद सख्यांनी सांभाळली.
कमल सुराणा,छाया मंडलेचा,चंदनबाला राका, राजश्री बिनायकिया, लीना कटारिया, कविता सेटीया, वर्षा टाटिया, कंचनमाला बाफना,सुनिता देसरडा, सुनिता बोरा, शोभा बंब.
ही स्वानंदच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या गणमान्य स्वानंद सख्या.
“आपला एकच उद्देश स्वचा विकास सर्वांचा विकास. ”
कार्यकर्ता बरोबर नेता घडविण्याचे काम स्वानंद संस्थेने केले आहे. स्वानंद संस्थेतील एक एक महिला म्हणजे एक एक संस्था आहे. त्यांच्यातील गुणवत्तेला,कार्यक्षमतेला बाहेर काढण्याचे काम करत आहोत.
हरहुन्नरी महिलांना सन्मानित करून त्यांच्या जगण्यातील आनंद द्विगुणीत करण्याचे काम स्वानंदने करीत आहे. हार्दिक पुरस्काराच्या मानकरी
१) मा. साधनाजी सवाने-स्वानंदरत्न साहित्य सेवा
२) मा. रंजनाजी शिंगवी-स्वानंदरत्न श्रुत आराधना
३) मा.सरलाजी कांकरिया स्वानंदरत्न आदर्श माता
४) मा.शोभाजी शिंगवी- स्वानंदरत्न कर्तव्यदक्ष नारी.
५) मा. सुषमाजी मुथा- स्वानंदरत्न श्रुत आराधना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्षा शोभा बंब यांनी केले. सत्कारमूर्तींचा सन्मान प्रमुखातिथी उद्योजिका नंदा कासार, समाजसेविका सुनीता कांकरिया, सुजाता नवले, संस्थापिका प्रा सुरेखा कटारिया स्वानंदच्या-अध्यक्ष शोभा बंब, सुनिता देसरडा कंचनमाला बाफना यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना रंजना शिंगवी म्हणाल्या,” स्वानंदने आमचा सन्मान करून अधिकच काम करण्याची प्रेरणा आम्हास दिली”. सरला कांकरिया यांनी आदर्शमाताचा पुरस्कार मिळण्याबाबत आपले भाव व्यक्त केले.”मुलं जेव्हा आदर्श होतात तेव्हा आई आदर्श होते. राष्ट्र उभारणीचं काम करणाऱ्या या स्वानंदने युवा पिढीचे कौतुक करून शाबासकीची थाप देऊन आई बरोबर मुलांनाही सन्मानित केले.”
समाजातील विविध घटकांना प्रोत्साहित करण्याचे काम केले. स्वानंद संस्थेच्या या पंचवीस वर्षाच्या वाटचालीला व पुढील करत असलेल्या विविध कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा..! – सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया सोळंकुरे. सत्कारमूर्ती सुषमा मुथा स्वानंदने झाकल्या मोत्यांचा सन्मान करून आम्हाला अधिकच उत्साही व प्रेरणा देण्याचे काम केले. शोभा शिंगवीनी स्वानंदच्या पंचवीस वर्षाच्या सहवासातील काही क्षणांचा आनंद व्यक्त केला. स्वानंदरत्न कर्तव्य दक्ष नारी पुरस्कार घेताना मनस्वी अधिक काम करण्याची प्रेरणा मला मिळाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपना जैन व डॉक्टर श्वेता राठोड यांनी केले. आभार प्रदर्शन सुजाता नवले यांनी केले.
कार्यक्रमाचे संयोजन सुजाता नवले, साधना सवाने, जयश्री कासार, व कमल सातपुते यांनी केले.
