You are currently viewing आरोग्य व अध्यात्म विकास शिबिराचे मा.लेडी गव्हर्नर कमलताई गवई यांच्या हस्ते उद्घाटन 

आरोग्य व अध्यात्म विकास शिबिराचे मा.लेडी गव्हर्नर कमलताई गवई यांच्या हस्ते उद्घाटन 

अमरावती :

अमरावती येथील माहेश्वरी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या 32 व्या आरोग्य व अध्यात्म विकास शिबिराचे उद्घाटन सुप्रसिद्ध समाजसेविका व माजी लेडी गव्हर्नर श्रीमती कमलताई गवई यांच्या हस्ते दिनांक 2 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता संपन्न होणार आहे. सुमारे सात दिवस या शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी उत्तर प्रदेश मधील मेरठ येथून तज्ञ मार्गदर्शक डॉ.गोपाल शास्त्री व त्यांचे सहकारी अमरावती येथे दाखल झाले आहेत.

हे शिबिर निवासी व अनिवासी स्वरूपाचे असून या शिबिरामध्ये आदर्श भोजन पद्धती उपवास व एनिमा ध्यान सुक्ष्मव्यायाम झाडांच्या पानांचा रस पालेभाज्यांचे सूप सलाद फळ 75 टक्के भाजीयुक्त अल्पोपहार हरबल काढा व संतुलित भोजन याचे प्रशिक्षण सात दिवस विनामूल्य तेव्हा देण्यात येणार आहे.

वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या व भवितव्यात आपल्याला कोणताही आजार होऊ नये यासाठी पूर्व तयारी करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी या शिबिरामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन या शिबिराचे मुख्य संयोजक व अध्यक्ष श्री राधेश्याम भुतडा उपाध्यक्ष श्री नंदकिशोर चांडक प्रा.नारायण लाहोटी व सचिव प्रा. जगदीश कलंत्री यांनी केले आहे. या शिबिरासाठी उत्तर प्रदेश मधून मेरठमधून आलेले आयएएसएसचे तज्ञ मार्गदर्शक डॉ. गोपाल शास्त्री हे विनामूल्य मार्गदर्शन करणार असून शिबीर स्थळी स्थानिक व बाहेरगावी येणाऱ्या शिबिरार्थींची माफक दरात अल्पोपहाराची भोजनाची व राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सात दिवसात तुम्हाला असलेले आजार हे काही प्रमाणात कमी होतात असा यापूर्वीचा 32 शिबिरांचा अनुभव आहे. म्हणून कोणत्याही प्रकारच्या आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांनी व भवितव्यात आपल्याला आजार होऊ नये यासाठी प्रतिबंध लावण्यासाठी या शिबिरामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन या शिबिराचे प्रसिद्धी प्रमुख व निरोग संस्थेचे कार्यकारिणीचे सदस्य प्राध्यापक डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी केले आहे. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली असून त्या समितीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक व उद्योजक श्री सुरेश करवा श्री अरुणभाई टाक श्री ललित भाई सांगाणी विनोद खेतान प्रा. प्रकाश लड्डा अजय जोशी सौ चंचल अग्रवाल डॉ. वैशाली गुल्हाने सागर झाडे दीपक करवा आणि श्री नंदकिशोर राठी यांचा समावेश आहे. हे शिबीर दररोज सकाळी सात वाजता प्रारंभ होणार असून सायंकाळी आठ वाजता प्रतिदिन या शिबिराचा समारोप होणार आहे.

 

प्रकाशनार्थ

प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे

सदस्य निरोग संस्था अमरावती

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा